Tuesday, 13 March 2012

गोष्टी hospital च्या . . .

१. हॉस्पिटल मधून चिमण्यांचा आवाज आला की समजावं कि नर्सेस रिकाम्या आहेत. नाही तर कामात असल्या तर आवाज पण ऐकता येणं मुश्किल असतं. आणि ऐकू येणारे dialogues ऐकून हवाच गुल! पण या पोरींच आयुष्य खडतर असतं. patient ला औषध द्यायचं तेही स्वत:चा patience न हरवता. १७६० फोन घ्यायचे आणि नोंदी ठेवायच्या. मग भेटायला येणारया नानाविध नातलगांना आवरायचं. डोक्याला वैताग देणारया सर्व गोष्टींची भरमार असूनही कशा काय या पोरी चिवचिवत राहतात देव जाणे. राग, लोभ, मद, मत्सर कुठे गुंडाळून ठेवावा हे यांच्याकडून शिकावं एखाद्याने. एक तर त्या औषधांच्या वासाने डोकं फुटायचही वेळ आली असते तरी सदा हसमुख राहायचं म्हणजे भारी गोष्ट आहे की नाही? त्यात या आपल्या ' कर्मण्येवाधिकारस्ते मां फलेषु कदाचन ' थाटात फिरत असतात.



२.

आई बाप स्वत: आजारी असताना पोरांना घेऊन का दवाखान्यात येतात? हुंडरत असताना हात धरून बसवलं जातं. मुक्त आणि बेधुंद किलबिलीवर बंधनं येतात. पोरंचं ती. किती वेळ एका जागी बसतील? सगळं करून थकले की मग टिवल्या बावल्या कर, तोंड वेंगाडून दाखव. दवाखान्यात बसलेल्या इतर माणसांमधलं मुल हरवलेलं असतं. त्यांना या सगळ्या माकडचेष्टा वाटत असतात.जर एखाद्याच्या मनातलं पोर जिवंत असेल तर तो हे सगळ enjoy करतो, दुखणं विसरुन.  पोरांकडे दुसरयांचं दु:ख पळवण्याची निसर्गदत्त देणगी असते. पण घेणारयाला त्याचं भान हवं ना? आणि जेव्हा तो एक माणूस ते enjoy करायला लागतो तेव्हा पोरांच्या पालकांची समाधी भंग पावते. मग पुन्हा पहिले पाढे पंचावन्न! मग त्या पोराला मारुन मुटकून बसवलं जातं. धमक असलेल्या पोराची मस्ती सुरुच राहते  पण सहसा पोरं कोमेजून जातात.



प्राक्तन पाटील

No comments:

Post a Comment