Social Media
social media एखाद्याची visibility अधोरेखित करतो. लोक techno savvy असोत व नसोत पण ते social website मधे गुंतलेले जरुर असतात. दोघांमधे संवाद असो व नसों पण social वेबसाइट वर व्यक्त (express) होणं हि गरज झालीये. facebook, orkut, twitter हि काही नामांकित नावं. ibibo, desi adda हे देशी brands. आता या websites वर जाऊन काय करायचं काय तर तिथे काही applications असतात. त्यात log in केलं कि इतरांना कळत कि तुम्ही कुठे गेला होतात आणि काय काय केलंत. अनेक applications असतात ज्यातून बराच काय काय कळत जातं. आणि असे hits पण बरेच येतात कि xyz was in Oberoi, abc visited KFC वगैरे वगैरे.
यामुळे फक्त तुमची virtual visibility दिसते. कशासाठी आहे हि virtual visibility ची गरज? लोकांना सतत कशात तरी गुंतवून ठेवणं हाच आहे पाया social media चा. आता एवढा visible राहण्याचा अट्टाहास कशासाठी असेल? कारण आज reality पेक्षा virtual reality ला जास्त महत्व आहे. Rat race मध्ये पळणारे आपण सगळे गळेकापू (cut throat) स्पर्धेला हि तोंड देतोय. त्यामुळे आजच्या काळात टिकून राहायचं असेल तर virtual visibility आणि virtual reality ला पर्याय नाही. कारण ' जो दिखता है वही बिकता है ' या न्यायाने प्रत्येक माणूस एक marketing product आहे. जे multi-talented किंवा multi-taskers आहेत ते उत्तम marketing mix आहेत. फक्त अपेक्षा सांगा, करून मिळेल. Show yourself to market yourself हाच आजचा मंत्र आहे. म्हणूनच या virtual visibility आणि social media चा बाऊ केला जातोय.
यात एक मोठी गोम आहे. हे सगळे applications फक्त भारी भारी phones वरच चालतात, म्हणजे Blackberry , Android आणि Apple I phone . कारण target clientele जे आहे ते elite (economic) class मध्ये मोडतात. कारण ज्या गोष्टींची applications बनवली जात आहेत त्या वस्तू प्रचंड महाग आहेत. उदाहरणार्थ Audi cars . एक application पाहिलं ज्यात तुमच्या screen वर एक Audi car दिसते जी वजनाने सर्वात हलकी असल्याची जाहिरात करायची आहे. तर या application मध्ये ती car दिसल्यावर तुम्हाला तुमच्या mic मध्ये फुंकर घालायची आहे. जेवढी जोरात फुंकर घालाल तेवढी ती car पुढे जाईल. आहे कि नाही मजा ?
आता हि गाडी सर्वसामान्यांना परवडणारी नाहीच. मग जाहिरातीत एवढी दणदणीत रक्कम मोजण्याचं कारण काय? आहे. जे target clientele आहे ते हि किंमत देऊ शकतात आणि म्हणूनच हा सगळा खटाटोप केला जातोय.