मन भरकटल कि फिरतच राहतं. गालिब पण म्हणून गेलाय ए- दिल - ए - नादान तुझे हुआ क्या है... कुठे तरी लांब निघून जातं. पकडू म्हटलं तरी मुठीत येत नाही. आपण म्हणतो कि तंद्री लागलीये, पण ज्याचं भरकटल तोच जाणे ती व्यथा. कळत असतं पण वळत नसतं, कारण मनाचा वारू भटकत असतो. त्यावर आपला जोर मुळीच नसतो. आणि मन म्हणजे काट्यात गुंतलेला पदर हि नव्हे, जो अलगद सोडवून घेता येईल. ते गुंततच जातं, कळत नकळत. पुरात गटांगळ्या खाल्ल्यावर जी अवस्था होते तीच इथेही होते. पूर तुला बुडवायला बघतो अन मन? मनाकडे अश्या युक्त्यांचा खजिना असतो. पुरातली धडपड दिसते पण मनाविरुध्ह चाललेलं द्वंद्व नाही दिसू शकत. आपणच स्वत:शी लढत असतो आणि आपणच धारातीर्थी पडतो. नेहमीच. कारण मनाला आपलं वर्म ठाऊक असतं. कुठला घाव कुठे घालावा हे जाणण्यात मनाएवढा वाकबगार कोणी हि नसतो.
अखेर विजय हि मनाचाच होतो. आपण हरणार युध्द लढत असतो. तरी कुठे तरी हरून ही आपण जिंकत असतो.
No comments:
Post a Comment