Wednesday, 6 June 2012


Social Media


social media एखाद्याची visibility अधोरेखित करतो. लोक techno savvy असोत व नसोत पण ते social website मधे गुंतलेले जरुर असतात. दोघांमधे संवाद असो व नसों पण social वेबसाइट वर व्यक्त (express) होणं हि गरज झालीये. facebook, orkut, twitter हि काही नामांकित नावं. ibibo, desi adda हे देशी brands. आता या websites वर जाऊन काय करायचं काय तर तिथे काही applications असतात. त्यात log in केलं कि इतरांना कळत कि तुम्ही कुठे गेला होतात आणि काय काय केलंत. अनेक applications असतात ज्यातून बराच काय काय कळत जातं. आणि असे hits पण बरेच येतात कि xyz was in Oberoi, abc visited KFC वगैरे वगैरे. 
यामुळे फक्त तुमची virtual visibility दिसते. कशासाठी आहे हि virtual visibility ची गरज? लोकांना सतत कशात तरी गुंतवून ठेवणं हाच आहे पाया social media चा. आता एवढा visible राहण्याचा अट्टाहास कशासाठी असेल? कारण आज reality पेक्षा virtual reality ला जास्त महत्व आहे. Rat race मध्ये पळणारे आपण सगळे गळेकापू (cut throat) स्पर्धेला हि तोंड देतोय. त्यामुळे आजच्या काळात टिकून राहायचं असेल तर virtual visibility आणि virtual reality ला पर्याय नाही. कारण ' जो दिखता है वही बिकता है ' या न्यायाने प्रत्येक माणूस एक marketing product आहे. जे multi-talented किंवा multi-taskers आहेत ते उत्तम marketing mix आहेत. फक्त अपेक्षा सांगा, करून मिळेल. Show yourself to market yourself हाच आजचा मंत्र आहे. म्हणूनच या virtual visibility आणि social media चा बाऊ केला जातोय. 
यात एक मोठी गोम आहे. हे सगळे applications फक्त भारी भारी phones वरच चालतात, म्हणजे Blackberry , Android आणि Apple I phone . कारण target clientele जे आहे ते elite (economic) class मध्ये मोडतात. कारण ज्या गोष्टींची applications बनवली जात आहेत त्या वस्तू प्रचंड महाग आहेत. उदाहरणार्थ Audi cars . एक  application पाहिलं ज्यात तुमच्या screen वर एक Audi car दिसते जी वजनाने सर्वात हलकी असल्याची जाहिरात करायची आहे. तर या application मध्ये ती car दिसल्यावर तुम्हाला तुमच्या mic मध्ये फुंकर घालायची आहे. जेवढी जोरात फुंकर घालाल तेवढी ती car पुढे जाईल. आहे कि नाही मजा ? 
आता  हि गाडी सर्वसामान्यांना परवडणारी नाहीच. मग जाहिरातीत एवढी दणदणीत रक्कम मोजण्याचं कारण काय? आहे. जे target clientele आहे ते हि किंमत देऊ शकतात आणि म्हणूनच हा सगळा खटाटोप केला जातोय. 

Friday, 1 June 2012

वार करणाऱ्या तलवारीची धार मोठी कि ती तलवार पेलणारा हात मोठा? त्या प्रमत्त हातातली ताकद मोठी कि त्या हातांमागच भेदरलेलं मन? काहीही असो, सगळ्यांची शेवटी मातीच होते. ज्याप्रमाणे नद्या गोड असूनही समुद्र खारटच असतो. कारण समुद्र साचलेला असतो. तो आपला खारटपणा नद्यांना घ्यायला भाग पाडतो. मग आपण त्या प्रवाहाला खाडी म्हणतो. खारट म्हणून खाडी कि खारट म्हणून अढी?

मनातली अढीच पण अशीच असते ना? लादलेल्या गोष्टींची अढी बनते. मग कालांतराने तिला पीळ पडत जातात. ती अढी दुस्तर बनून बसते. उजीच म्हणतात कि सुंभ जळला तरी पीळ सुटत नाही. कसा सुटेल पीळ? पीळ पडायला जितका वेळ गेला त्याच्या दुप्पट वेळ सुटायला द्यावाच लागेल. अथवा पीळ पडूच देऊ नका. पीळ किंवा अढी फोडायचा प्रयत्न करा. प्रश्न सुटतील किंवा निदान उग्र तरी होणार नाही. आणि त्यांना तोंड हि द्यावं लागणार नाही. 

छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण हवा लागते आणि अढीचा गंज लागतो. मग किती वेळ लागतोय पीळ पडायला? सुरुवातीचा पीळ पडला कि पुढचे पीळ आपोआपच पडतात. नवीन पीळ जितके जास्त तितका जुना पीळ जास्त घट्ट. सोडवू म्हटलं तरी सुटत नाहीत.  

मन

मन भरकटल कि फिरतच राहतं. गालिब पण म्हणून गेलाय ए- दिल - ए - नादान तुझे हुआ क्या है... कुठे तरी लांब निघून जातं. पकडू म्हटलं तरी मुठीत येत नाही. आपण म्हणतो कि तंद्री लागलीये, पण ज्याचं भरकटल तोच जाणे ती व्यथा. कळत असतं पण वळत नसतं, कारण मनाचा वारू भटकत असतो. त्यावर आपला जोर मुळीच नसतो. आणि मन म्हणजे काट्यात गुंतलेला पदर हि नव्हे, जो अलगद सोडवून घेता येईल. ते गुंततच जातं, कळत नकळत. पुरात गटांगळ्या खाल्ल्यावर जी अवस्था होते तीच इथेही होते. पूर तुला बुडवायला बघतो अन मन? मनाकडे अश्या युक्त्यांचा खजिना असतो. पुरातली धडपड दिसते पण मनाविरुध्ह चाललेलं द्वंद्व नाही दिसू शकत. आपणच स्वत:शी लढत असतो आणि आपणच धारातीर्थी पडतो. नेहमीच. कारण मनाला आपलं वर्म ठाऊक असतं. कुठला घाव कुठे घालावा हे जाणण्यात मनाएवढा वाकबगार कोणी हि नसतो. 

अखेर विजय हि मनाचाच होतो. आपण हरणार युध्द लढत असतो. तरी कुठे तरी हरून ही आपण जिंकत असतो. 

Monday, 28 May 2012

Train Fun

स्थळ - विरार
वेळ - ५.०७ (सा.)
वापी शटल
जनरल compartment 

गाडी सुटायची वेळ, daily चे प्रवासी उड्या मारत येताहेत पण गाडी आधीच खच्चून भरलीये. शुक्रवार असल्याचा परिणाम असावा.
माझ्या बोगीत ४ गुजराथी बायका पसरल्यात. म्हणजे बसू शकल्या असत्या पण पसरूनच गेल्यात. एक नवविवाहित जोडपं बसलंय, कुणाच्या अध्यात न मध्यात. बाकीचे बसल्या जागी उडताहेत पण हे दोघे मात्र स्वर्गात पोचलेत. एक मध्यमवर्गीय मराठी कुटुंब आहे, अगदी मध्यमवर्गीयांच्या गुणांसकट. हक्क मागायला न लाजणारे पण थोडीशी दडपशाही झाली कि लगेच दडपून जाणारे. 
गाडी सुटायच्या आधी एक बाई / मुलगी आली. इकडे तिकडे पाहिलं आणि टुणकन उडी मारून वर चढून बसली. आता माझ्या मुंबई लोकलवाल्या डोक्याला झटकाच बसला. धावती लोकल  पकडणं  वेगळ आणि उडी मारून वर चढून जागा पटकावण वेगळ. आणि तेही under tremendous pressure ! कारण त्याच वेळी एक दुसरे काकाही तीच जागा पटकावण्याच्या हिशोबात होते.
अखेर कंटाळवाणा प्रवास सुरु झाला. बाजूला दोन छोट्या बहिणी बसल्या आहेत. पण त्यातली छोटी केव्हाच झोपली आणि दुसरी बिचारी आईच्या दडपशाहीचा (?) विरोध न करता बसली आहे. बालसुलभ औत्सुक्यापोटी माझं लिखाण वाचायचा प्रयत्न करतेय बहुतेक. पण माझं अक्षरच इतकं दिव्य आहे कि ते वाचता येणाऱ्या माणसाचा मी अतीव आदर करतो. अगदी शाळेत असल्यापासून आई, शिक्षक आणि मित्रांनी ( copy करण्यासाठी ) ते सुधारण्याचे पुरेपार प्रयत्न केले. पण माझं अक्षर सुधारणं म्हणजे बापरे! म्हणजे कधी तरी ते readable असू शकतं पण माझा हात त्या प्रकारे क्वचितच वळतो. आता जी गोष्ट हातातच नाही ती बोटात कुठून येणार?
वैतरणा  स्टेशनच्या अलीकडे एक सिग्नल लागला आणि एवढे fuel tankers पाहिले कि भारत श्रीमंत झाल्याची दिवास्वप्न मला पडलं. हे स्टेशन एक खतरनाक आहे, आजूबाजूला दूर दूर पर्यंत वस्तीच दिसत नाही. लगेच खाडी लागते आणि मासेमारी करणाऱ्या बोटी दिसतात. आधी मस्त वल्हवत जाणाऱ्या होड्या होत्या, आता फक्त धूर ओकणाऱ्या बोटी दिसतात.

सफाळे ! या स्टेशनचा मी लहानपणापासून सफरचंद आणि केळ्याशी सबंध जोडत आलोय. अकारणच. केळी तर दिसताच नाहीत आणि सफरचंदाचा तर प्रश्नच नाही. बरेच छोटे मोठे वाडे दिसतात. श्रीमंत लोकांची येथे वस्ती आहे असं ऐकून आहे. अचानक खूप वर्षांनी ते रेल्वेचे खटके दिसले. खेचून रूळ बदलण्याचे. अमिताभच्या ' तुफान ' चित्रपटात महत्वाचा रोल केलेले. 


लहानपणी रेल्वेने गावाला जाताना मी ' मामाच्या गावाला ' फेम गाणं म्हणायचो. आता कसली झाडं आणि कसलं काय? कारण आम्हीच इतक्या जोरात पळतोय कि बाहेर पाहताना बुब्बुळ स्थिर ठेवणं अशक्य आहे. रेल्वे side झोपडपट्टीची लागण इथेही झाली आहे. आत्ताच मी झो.पु.यो. म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा बोर्ड पाहिला. म्हणजे आधी झोपड्या वसावा, मग त्या पाडा आणि नंतर त्यांचं पुनर्वसन करा. ( करदात्यांना झोपवा योजना ! ) . आपल्या सरकारकडे खूप पैसा आहे याचसाठी. तिकडे विदर्भात आणि मराठवाड्यात शेतकरी मरतोय, आत्महत्या करतोय. मरू दे. आपल्याला काय? सगळे शेतकरी मेले कि मतदार संघ बदलून घ्यायचा. नेमेचि येतो पावसाळा या हिशोबाने निवडणुका तर येतीलच. पाहून घेऊ. करू काही तरी.

केळवा. मुंबईचं गोवा. beach. कुमार आणि किशोरवयीन मुलामुलींच आवडतं पर्यटन स्थळ. मुंबईबाहेरअसल्याने आणि आई वडिलांची चिंता नसल्याने यथेच्छ गर्दी. हातात बॉल पासून frisbee पर्यंत सर्व काही. ५.३०-६.३० हि मुंबईची गाडी पकडण्याची वेळ. म्हणजे ८-९ पर्यंत घरी पोहोचून प्रश्नोत्तरांची वेळ येत नाही. 
अजून एक सिग्नल. राजधानी जाण्यासाठी आमची गाडी siding ला काढलेली. राजधानीच्या नावावर दुसऱ्या २-३ गाड्या पण सोडवून घेतल्या.  


नवविवाहित जोडपं झोपेतून जागं झालय. चहावाल्याचा धक्का लागला बहुतेक. दुसऱ्यांच्या पोरांच्या मर्कटलीला बघत हसताहेत. स्वत:ची पोरं झाल्यावर बघणेबल असतील यांचे चेहरे. बाब्या कुठला आणि कार्टा कुठला हेच कळणार नाही.
आता लोकांचे चेहरे पालटायला लागलेत. ज्यांची गावं जवळ आलीयेत त्यांच्या चेहऱ्यावर गावाची ओढ दिसतेय. ज्यांची गावं अजून दूर आहेत त्यांच्या चेहऱ्यावर कुतरओढ स्पष्ट दिसतेय. 


Eastern side ला डोंगरांची रांग दिसतेय. बहुतेक सारे काळवंडले आहे. ढगांची सावली हेही एक कारण आहे. आणि मधूनच एक सुळका आपलं प्रकाशाचं लेणं मिरवतोय. बाकी जमिनी ओस पडल्यात. ताडामाडाची झाडं खोल गेलेली आपली मुळं चाचपडत अस्तित्व टिकावताहेत. 


पालघर  आणि उमरोळी बेकार स्टेशन्स. इथे काहीही नसतं. फक्त glass मधून पाणी विकणाऱ्या पोरांची लगबग आणि चेहऱ्यावरच्या अजिजी मागचं पोटातलं दैन्य, आपले डोळे पाणावल्याशिवाय राहत नाही. आणि तिथेच भडक फुललेला गुलमोहर ! या रणरणत्या उन्हात डोळ्यांना दिलासा देतोय कि स्वत:च्या वेदना मिरवतोय? या ओसाड जमिनीवर झाडांमधून वणवा पेटल्याचा भास होतोय.     
 

बोईसर ! Western suburbs च्या पुढे असलेली indusrtial नगरी. बरेच वर्षांपासून येथे निरनिराळे कारखाने होते. आधी फक्त रासायनिक खाते बनवणाऱ्या कंपन्या होत्या पण आता औषधांपासून बरंच काही बनतं. फेमस तारापूर अणुविद्युत केंद्र इथलंच. प्रकल्पग्रस्तांच पुनर्वसन (?) करून पसरलेला प्रकल्प. 


ठणठणठण ! गाडी पुन्हा थांबली. मी तयारीत होतो. म्हटलं, लागला पुन्हा सिग्नल ! मागच्या माणसाने विचारलं उतरणार का? मी म्हटलं हो. वाणगाव आलं कि उतरतो. तो म्हणाला हेच वाणगाव, उतर लवकर. स्टेशन तर दिसेना. मारली उडी. मग इकडे तिकडे पाहिलं तर पुढे कुठे तरी स्टेशन सदृश काही तरी दिसलं. मग चालत चालत स्टेशन वर गेलो, कारण S.T.Stand तिथेच आहे. पण आजकाल तिथे S.T. येत नाही. स्थानिक दळणवळणासाठी टमम / डमडम. ८ seater रिक्षांमध्ये  १० माणसं कोंबून प्रवासनामक प्रकार सुरु होतो. मग बसलो मीही त्यांच्यात. इथे तिथे डोकं आपटत गावाला निघालो. रस्त्यांची कृपा. 


आजूबाजूला निशिगंधाची शेती पाहत सफर सुरु होती. इथली फुलं निर्यात होतात म्हणतात. पण होती मस्त सुरेख ती शेती. सकाळी सकाळी या शेतातून फिरायला धमाल येते. दुपारच्या वेळी फिरलं कि डोक्यावरच उन जाणवेनास होतं. संध्याकाळी तर खाट टाकून झोपायची इच्छा होते.   


बस, एकदाचा पोचलो आणि निश्वास सोडला. पण गावाच्या मातीचा सुगंध वेगळाच. शेणाच्या, मातीच्या आणि धुराच्या संगमातून जे निघतं तो गावाचा वास! आल्हाददायक प्रकार. घरी bag टाकली आणि पाणी प्यायलो. हे गावोगावीच मचूळ पाणी, जे माझ्या आई वडिलांना गोड लागतं. 


पण असो, अपने मिट्टी कि खुशबू और कुवे का पाणी सबको प्यारा हि लगता है ... 

Thursday, 24 May 2012

आयुष्य ... एक कोडं


Zindagi ...kaisi hai paheli, haaye
Kabhi to hansaaye kabhi ye rulaaye
Zindagi...

आयुष्य ... कसं कोडं आहे न जाणे
कधी हे हसवेल तर कधी रडवेल 
आयुष्यच ते....

Kabhi dekho man nahi jaage peechhe peechhe sapno ke bhaage
Ek din sapno ka raahi chalaa jaaye sapno ke aage kaha
Zindagi...

कधी मनाला जागच येत नाही 
स्वप्नांच्या मागोमाग धावत जात
आणि एके दिवशी स्वप्नांचा साथी
स्वप्नांच्या पार निघून जातो ....

Jinhone sajaaye yaha mele sukh-dukh sang-sang jhele
Wahi chunkar khaamoshi yu chali jaaye akele kaha
Zindagi...

ज्यांनी आनंद दिला, सुख दु:ख एकत्र उपभोगलं
तेच मौन धारण करून निघून जातात कुठे तरी
असच असतं आयुष्य .....

Saturday, 19 May 2012


Zindagi Ka Safar Hai Ye Kaisa Safar
Koi Samjha Nahin Koi Jaana Nahin
Hai Ye Kaisi Dagar Chalte Hain Sab Magar
Koi Samjha Nahin Koi Jaana Nahin

-
आयुष्याचा प्रवास, कसा आहे हा प्रवास
कोणी समजू शकलं नाही, कोणीच जाणू शकलं नाही
हि खडतर वाट सगळेच चालतात 
पण कोणालाच उमगत नाही 

Zindagi Ko Bahut Pyaar Hamne Kiya
Maut Se Bhi Mohabbat Nibhaaenge Ham
Rote Rote Zamaane Mein Aaye Magar
Hanste Hanste Zamaane Se Jaaenge Ham
Jaaenge Par Kidhar Hai Kise Ye Khabar
Koi Samjha Nahin Koi Jaana Nahin

-
आयुष्यावर खूप प्रेम आम्ही केलं
मृत्यू हि असाच उपभोगू आम्ही
रडत रडत जगात आलो आम्ही 
हसत हसत जगातून जाऊ आम्ही 
जाऊ कुठे हे कोणाला ठाऊक 
कोणीच समजू शकत नाही,  कोणीच जाणू शकलं नाही  

Aise Jeevan Bhi Hain Jo Jiye Hi Nahin
Jinko Jeene Se Pehle Hi Maut Aa Gayi
Phool Aise Bhi Hain Jo Khile Hi Nahin
Jinko Khilne Se Pehle Fiza Kha Gai
Hai Pareshaan Nazar Thak Gaye Chaaraagar
Koi Samjha Nahin Koi Jaana नाहीन

-
अशीही आयुष्य आहेत जी जगलीच नाहीत 
ज्यांना जगण्यापूर्वीच मृत्यूने गाठलं 
फुलं अशीही आहेत जी उमललीच नाहीत    (स्त्री भ्रूण हत्या / Female Infanticide)
ज्यांना उमलण्यापूर्वीच पानगळीने कोमेजवलं
त्रस्त झालीये नजर, थकलेत डोळे 
कोणीच समजू शकत नाही,  कोणीच जाणू शकलं नाही

Monday, 14 May 2012

एक होता शेरखान


हा शेरखान जंजीर मधला प्राण नाही, हा शेरखान मोगली मधला. नाना पाटेकर ने आवाज दिलेला. तर, शेरखान एक वादग्रस्त तरी उदात्त व्यक्तिमत्व. (निदान माझ्यासाठी तरी)

नावात काय आहे अस Shakespear कधी तरी म्हणाला होता पण नकोच. माझे मित्र त्याला शेरखान म्हणतात. आता, हा शेरखान म्हणजे area चा दादा. याला डरकाळी फोडायची गरज नाही कारण डोळ्यातल्या जाळाने माणूस खाक होईल इतकी तीव्रता! याला ओळखत नाही असं माणूस मला अजून भेटायचंय. याचे उमेदीचे दिवस बघायला मी जन्मलो नव्हतो (माझ्या  नशिबाने!).      

दृश्य स्वरूप - कधी काळी व्यायामाने पोसलेला देह, माथ्यावर तुरळक केस, उरलेले मागे वळवलेले, बोकड दाढी, shirt pant  आणि हो एक 1st class Bullet. shirt नसेल तर अंगभर त्वचा सदृश tattoos. दंडाची बेटकुळी आता लटकली असली तरी त्यातली ताकद मी २६ जुलै च्या पुरात पाहिली होती. रिक्षावाला रिक्षासकट वाहून जात असताना या पठ्ठ्याने ती पकडली होती. अरे काय तो पुराचा पाशवी वेग आणि एक मर्त्य मानव त्याला आव्हान देतो? हो. दिलं होतं. आणि त्याच मर्त्य मानवाने एकाचे प्राण वाचवले होते. त्या दंडाची बेटकुळी फुटण्याएवढी फुगली होती. माझ्यासारखे बघे बरेच होते पण आमची काय मजाल त्या पुरात घुसण्याची? त्यासाठी जीवावर उदार होण्याची गरज असते आणि माझ्यासारख्या पांढरपेशी माणसाला कुठून येणार ती? 
या घटनेपर्यंत शेरखानकडे भीतीने पाहणारा मी नंतर पूर्ण आदराने बघायला लागलो. किती किस्से सांगू याचे अजून?          

एक काळ होता याने आणि याच्या मित्रांनी राज्य केलाय मुंबईवर. हे तो नाही सांगत पण अशा गोष्टी लपतहि नाहीत. खून, सुपाऱ्या, खंडण्या काय काय नाही केलं? पण माणुसकी असलेला दादा. शिकला नाही म्हणून नोकरी नाही, नोकरी नाही म्हणून लग्न नाही. भाच्या पुतण्यांवर माया ओततोय. पुर्वायुष्यातल्या कृत्यांमुळे जीव कोंड्तोय म्हणून दारू पितोय. ज्यांचे मुडदे पाडले त्यांच्या मुलांनी येऊन धक्का मारला तरी मरेल एवढी पितोय. 

असं हा शेरखान जो जिवंतपणीच एक दंत कथा बनलाय, त्याला माझी हि आदरांजली .