आपण कसे असतो आणि कसे घडतो? उदाहरणार्थ मी पुरुष आहे ( माझी प्राथमिकता ), मी मुलगा आहे आणि बाप होईन (हे द्वितीय). मी माणूस कधी होतो आणि नसलो तर कधी होईन. माझं पौरुष काय आहे किंवा काय होऊ शकतं? बायकोला (किंवा मुलींना) गरोदर केल्याशिवाय माझं पौरुष सिद्ध होणारच नाही का? पौरुष हिंसक आणि वेदनादायीच का असावं? ते अलवार किंवा तरल का असू नये?
हे सगळे प्रश्न आपल्या मानसिकतेत दडलेले आहेत. बरयाच म्हणी याचेच दाखले देतात. " चुरगळ्याखेरीज अत्तराचा परिमळ दरवळत नाही", याचा काय अर्थ काढायचा ? स्त्रीला अत्तराची उपमा दिलीये की तिला नासवल्याखेरीज मजा येणार नाही हे सांगितलय? वेदनांकित सुख खरच असातं कि हेही मनावर ठसवल गेलय? बरयाच स्त्रिया खाजगीत मान्य करतात कि संभोग हा वेदनादायीच असतो आणि पुरुष मानतात कि जेवढ्या वेदना जास्त तेवढी 'मर्दानगी' जास्त. अनादी काळापासुन हेच चालत आल आणि राहीलही. पण मग सुख कुठे गेलं आणि ते कसं मिळेल हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.
एक तर आपल्याकडे हा विषय वर्ज्य. कोणी बोलत पण नाही. कोणालाच हा प्रश्न पडत नाही का? कि आपली मानसिकताच अशी झालिये कि प्रवास वेदनेतून सुखाकडे जातो असं मानलं जातं?
मी अमुक एवढ्या मुलींचे गर्भपात करवले यावर कसं कोणाचं पौरुष सिद्ध होऊ शकतं? काही जोडपी एवढी निष्णात असतात कि दिवस मोजून आणि वजाबाक्या करुन कार्यभाग सिद्ध करतात आणि वर कसं manage केलं यावर टाळ्या घेतात. यात कौतुकास्पद काय आहे? कोणी काय करावं हे मी ठरवू इच्छित नाही तरि एकाची वेदना दुसरयाचं सुख कसं असू शकते?
मानवी शरिराच्या गरजांचं प्रमाण व्यस्त असू शकतं आणि असेलही. पण हा काही उपाय ठरू शकत नाही. गरज नाकारण ही उपाय नाही. लीव इन रिलेशनशीपला माझा पाठिंबा आहे पण विवाहबाह्य संबंधांना नाही. कारण मानलं तर आहे फरक आणि मानलं तर नाही. मी मानतो फरक. आज कायदा आहे लीव इन रिलेशनशीप साठी आणि विवाहबाह्य संबंधांसाठी नाही यातंच सारं काही आलं.
लीव इन रिलेशनशीपची चर्चा झाली आणि विवाहबाह्य संबंधांची नाही झाली. विवाहबाह्य संबंध अनादी काळापासुन आहेत फक्त चर्चा झाली नाहिये. उदाहरणार्थ , राजा राणीला मूल होत नाहिये, मुनीचा आशिर्वाद घेतला, झालं मूल. मूल काही आकाशातून तर नाही ना पडलं? पुरुष आणि स्त्रीचा संबंध आल्याशिवाय जीव जन्माला येत नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. [आपण समजू TEST TUBE BABY तेव्हाचा शोध होता जो कालचक्रात आपल्याकडून हरवला. उदा. कौरव] पण कुंती आणि माद्रीचं काय? पंडुराजाने पंडुरोगात पौरुष गमावलेलं, मग पांडव त्याचे पुत्र कसे? बाप असणं आणि नाव देणं यातही फरक असेलंच कि. कर्ण कुंती आणि सूर्याचा अनौरस पुत्र म्हणून का गणला गेला? हे विवाहबाह्य संबंध नव्हते ?
खूप पूर्वी इजिप्त आणि रोमन राज्यामध्येही एक प्रथा होती. राजा जर पुरुष नसेल तर राणी सबंध राज्यातील कुठल्याही पुरुषाकडून हे सुख प्राप्त करुन राज्याला वारस देऊ शकते.
अमिताभ आणि सैफ अली खानच्या 'एकलव्य' चित्रपटाचा हाच विषय होता.
आता लीव इन रिलेशनशीप कडे वळतो. हे ही नवीन नाहीये आपल्याला. जे नक्षलवादी किंवा लाल (communist) चळवळीत होते किंवा ज्यांनी त्याबद्दल वाचलय त्यांना कळेल मी काय म्हणतोय ते. एकाच ध्येयाने प्रेरित होउन एकाच दिशेने वाटचाल करणारया त्या माणसांना नव्हत्या का शारिरीक गरजा? ज्यांनी (लग्न न करता) एकत्र राहून त्या मिळवल्या किंवा भागवल्या ते आपल्या लीव इन रिलेशनशीपचे आद्य उपासक आणि प्रचारकच आहेत.
लीव इन रिलेशनशीप आणि विवाहबाह्य संबंधांमध्ये एक मूलभूत फरक आहे. लीव इन रिलेशनशीप मध्ये स्वातंत्र्य आहे(मानलं तर). विवाहबाह्य संबंधांमध्ये सुरुवात होते ती गरज म्हणून आणि शेवट होतो तो वापरुन घेतल्याच्या जाणिवेत, (स्त्री आणि पुरुष दोहोंसाठी). आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांवरिल अत्याचारांनानेहमीच झुकते माप दिले जाते तरिही पुरूषांसाठी तो नेहमीच तोंड दाबून बुक्कयांचा मार ठरतो. (ठरू शकतो)
कळावे, प्राक्तन पाटील

Deep thought....!!!!
ReplyDeleteneed 2 sit back 4 a while n think....