मी एक स्वप्न पाहिलं. त्यात मी एका देवालयात फिरत होतो. अद्भुत आणि विस्मयचकित होण्याइतपत सुंदर होतं ते. अचानक मला हुंदक्यांचा आवाज आला. मी पुढे गेलो, तिथे एक म्हातारा मनुष्य गुढग्यात मान घालून रडत होता. मी पुढे होउन त्याला सांत्वनपर स्वरात विचारलं," काय झालं आजोबा? का रडताय? नाव काय तुमचं? " तर म्हातारा उत्तरला," परमेश्वर " . मी त्याच्या डोळ्यात वेडाची झाक दिसते का ते पाहून घेतलं. नव्हती ! मी पुन्हा विचारलं," का रडताय? " तो म्हणाला," माझ्या एकुलत्या एका मुलाने मला फसवलय. " मी विचारलं," काय नाव आहे त्याचं? " तो म्हणाला, " मनुष्य."
लिओ टॉलस्टॉय
No comments:
Post a Comment